झिवाने दिले धोनीला मैदानात जाऊन पाणी

मुंबई| काल भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलीवूड कलाकारांमध्ये फुटबॉलचा सामना मुंबईत रंगला. या सामन्याचे नाव ‘सेलिब्रिटी क्लासिको’असे होते. हा मैत्रीपूर्ण सामना चॅरिटीसाठी खेळला गेला.

या सामन्यात भारतीय खेळाडूंच्या ऑल हार्ट्स एफसी संघाने बॉलीवूड कलाकार असणाऱ्या ऑल स्टार्स एफसी संघाचा ७-३ ने पराभव केला.

या सामन्यात २ गोल करणारा एम.एस. धोनी सामनावीर झाला. लहानपणी फुटबॉल खेळणाऱ्या धोनीने दोन गोल करून ऑल हाइट्स संघाकडून महत्वाची कामगिरी बजावली.

या सामन्यादरम्यान धोनीची मुलगी झिवाने सामना संपल्यावर आपल्या बाबाला पाण्याची बाटली नेऊन दिल्याचा फोटो वायरल झाला आहे. त्यात झिवा धोनीला पाण्याची बाटली देत आहे.

कालच धोनीने त्याचा आणि झिवाचा बेसनाचा लाडूवर ताव मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि आता हा झिवाचा आणि त्याचा गोड फोटो वायरल झाल्याने धोनीचे चाहते मात्र खुश आहेत.