Video: जेव्हा झिवा म्हणते मल्याळम गाणे

भारताचा माजी कॅप्टन कूल एम एस धोनीची मुलगी झिवा सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात ती मल्याळी गाणे म्हणत आहे.

इंस्टाग्रामला तिच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात ती मोठमोठ्याने हे मल्याळी गाणे म्हणत आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता अनुपम खेरने झिवा वेगवेगळी गाणी म्हणते या विषयी ट्विटरवरून सांगितले होते. अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी रांची डायरीज प्रोजेक्ट निमित्त रांचीला भेट दिली होती तेव्हा ते धोनीच्या घरी गेले होते.

विशेष म्हणजे चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटरवरूनही हा विडिओ शेअर करण्यात आला आहे.

याआधीही झिवाचे अनेक व्हिडीओ वायरल झाले आहेत. नुकताच विराटनेही तिच्या बरोबरचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तसेच धोनीने तिचा आणि त्याचा बेसन लाडू खातानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता.