मँचेस्टर युनाइटेडकडून इब्राहिमोविच खेळणार १० नंबर जर्सी घालून

स्वीडनचा आघाडीचा फुटबॉलपटू ज्लाटन इब्राहिमोविच याने त्याचा व्यावसायिक फुटबॉल क्लब मँचेस्टर युनाइटेड सोबतचा करार वाढवला आहे. इब्राहिमोविच याने मँचेस्टर संघासोबत नवीन एक वर्षाचा करार केला आहे. मँचेस्टर युनाइटेड क्लबने या बाबत गुरुवारी अधिकृत घोषणा केली.

इब्राहिमोविच २०१५-१६ च्या समर ट्रान्सफरमध्ये पॅरीस सेंट जर्मेन संघासोबतचा करार संपवून मँचेस्टर युनाइटेड संघासोबत करारबद्ध झाला होता.तो करार या जूनमध्ये संपला होता. या वर्षी त्याने पुन्हा एका वर्षाचा करार केला आहे.

मागील वर्षी इब्राहिमोविचने मॅन युनाइटेड संघासाठी खूप चांगली कामगिरी केली होती. त्याच्या कामगिरीमुळे युनाइटेड संघ युरोपा लीगच्या अंतिम फेरीत पोहचू शकला होता. त्यानंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळे इब्राहिमोविच युनाइटेडसाठी पुढील सामने खेळू शकला नाही.

इब्राहिमोविचने पुन्हा करार केल्यानंतर सोशल मीडिया वर त्याने आणि मँचेस्टर युनाइटेडने काही व्हिडिओ शेअर केला त्यात तो म्हणतो,”मी जे सुरु केले होते ते पूर्ण करण्यासाठी आलो आहे.” दुसऱ्या व्हिडीओ मध्ये तो युनाइटेड संघाची जर्सी परिधान करताना दिसतो. तो मँचेस्टर युनिटेडसाठी नंबर १० ची जर्सी घालून खेळणार आहे. या पूर्वी तो ९ नंबरची जर्सी परिधान करायचा, मात्र लुकाकू जेव्हा युनाइटेड सोबत करारबद्ध झाले तेव्हा त्याने ९ नंबरची जर्सी इब्राहिमोविचकडून घेतली.

या पूर्वी मँचेस्टर युनाइटेड संघासाठी वेन रुनी १० नंबरची जर्सी परिधान करायचा. यंदाच्या मोसमात तो एव्हरटन क्लबसाठी काराबद्ध आहे. नुकतीच रुनीने अंतरराष्ट्रीय स्थरावरवरून निवृत्ती घेतली आहे.