झ्लाटनने दिले टिकाकरांना चोख प्रत्युत्तर, केले जबरदस्त कमबॅक

स्वीडनचा माजी दिग्गज फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविच याने मेजर लीग सॉकरमधील (एमएलएस) हॅट्ट्रीक केल्यानंतरचा आनंदोत्सव साजरा करतानाचा आणि मॅंचेस्टर युनायटेड कडून खेळताना झालेल्या दुखापतीचा फोटो शेयर केला आहे.

हे फोटो ट्विट करताना झ्लाटनने त्याला “ते म्हटले की सगळे संपले, मी म्हटले नाही”, असे कॅप्शन दिले आहे.

35 वर्षीय, या माजी स्वीडीश फुटबॉलपटूने अमेरिकेत सुरू असलेल्या एमएलएस स्पर्धेत एलए गॅलक्सीकडून खेळताना 17 सामन्यात 15 गोल केले आहेत. यामुळेच एमएलएसने त्याची या आठवड्याचा उत्कृष्ठ फुटबॉलपटू म्हणून निवड केली.

झ्लाटन हा 2016-18 ही दोन वर्षे मॅंचेस्टर युनायटेड कडून खेळताना सर्वाधिक वेळ दुखापतीने संघाच्या बाहेरच होता. पण सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत त्याने चांगलेच पुनरागमन करून या ट्विटमधून टिकाकरांना चोख प्रत्युत्तर दिले.

स्वीडनच्या फुटबॉल इतिहासात आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल करण्यात इब्राहिमोविच पहिल्या स्थानावर आहे. त्याने 116 सामन्यात 62 गोल केले आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर गोन्झालो हिग्नेइनने जुवेंट्स सोडून एसी मिलॅन क्लबमध्ये प्रवेश केला

फिट असूनही रोनाल्डो खेळणार नाही रियल माद्रिदविरुद्धचा सामना