अफगाणिस्तानवर भारताचा दणदणीत विजय: टी-२० वर्ल्ड कप २०२४ सुपर एट सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी
टी-२० वर्ल्ड कप २०२४ मधील सुपर एट सामन्यात भारताने अफगाणिस्तानला ४७ धावांनी पराभूत करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळलेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १८२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १३४ धावांत ऑलआऊट झाला. भारतीय फलंदाजांचे दमदार प्रदर्शन भारताची सुरूवात समाधानकारक झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा केवळ ८ धावा काढून बाद झाला. मात्र, विराट कोहली (२४) आणि ऋषभ पंत (२०) यांनी डाव सावरला. सूर्यकुमार यादवने २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार मारत शानदार ५० धावा केल्या. हार्दिक पांड्यासोबत (३२) पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करत भारताला भक्कम स्थितीत नेले. शेवटच्या षटकांमध्ये अक्षर पटेल (१२) आणि रवींद्र जडेजा (७) यांनी काही महत्त्वाच्या धावा करत संघाचा स्कोअर १८१ धावांपर्यंत पोहोचवला. अफगाणिस्तानकडून कर्णधार
Read More